पाच हजारावर उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST2021-09-05T04:47:26+5:302021-09-05T04:47:26+5:30

नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा वाढली असून, गुणवान उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. ...

Over five thousand candidates appeared for the MPSC examination | पाच हजारावर उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा

पाच हजारावर उमेदवारांनी दिली ‘एमपीएससी’ची परीक्षा

नोकरी मिळविण्यासाठी उमेदवारांमध्ये स्पर्धा वाढली असून, गुणवान उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने निवड करण्यासाठी ‘एमपीएससी’मार्फत विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा-२०२० ही परीक्षा ४ सप्टेंबरला वाशिम शहरातील राजस्थान महाविद्यालय, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल, श्री शिवाजी विद्यालय, श्री तुळशीराम जाधव कला व विज्ञान महाविद्यालय, सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय, एस. एम. सी. इंग्लिश स्कूल, हॅपी फेसेस हायस्कूल, श्री. बाकलीवाल विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा, रेखाताई राष्ट्रीय कन्या विद्यालय, शासकीय तंत्र निकेतन, मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय, श्रीमती मालतीबाई सरनाईक कन्या शाळा, सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, जवाहर नवोदय विद्यालय यासह मंगरूळपीर शहरातील यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, यशवंतराव चव्हाण विद्यालय, कलंदरिया उर्दू हायस्कूल, यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कूल, सिद्धार्थ विद्यालय या उपकेंद्रांवर घेण्यात आली.

००००००००००००

दीड हजारावर विद्यार्थी अनुपस्थित!

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब पूर्वपरीक्षा-२०२० या परीक्षेला दीड हजारावर विद्यार्थी अनुपस्थित राहिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.

Web Title: Over five thousand candidates appeared for the MPSC examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.