समृद्ध गाव मिनी स्पर्धेत १५ गावांची चमकदार कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:44+5:302021-03-23T04:43:44+5:30

मंगरुळपीर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२० गुणांची समृद्ध ...

Outstanding performance of 15 villages in Samriddha Gaon Mini Competition | समृद्ध गाव मिनी स्पर्धेत १५ गावांची चमकदार कामगिरी

समृद्ध गाव मिनी स्पर्धेत १५ गावांची चमकदार कामगिरी

मंगरुळपीर तालुक्यातील १९ गावांनी पाणी फाऊंडेशनच्या समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२० गुणांची समृद्ध गाव मिनी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विहिरींची पातळी, विहिरी, कूपनलिकांची गणना, हंगामनिहाय पीक माहितीच्या संकलनासह इतर काही महत्त्वपूर्ण कामांचा समावेश होता. यात मंगरुळपीर तालुक्यातील १६ गावांत स्वत: सरपंचांनी पुढाकार घेत गावकऱ्यांना प्रेरणा दिली, तर शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनींनी कोरोना संसर्गाच्या भीषण वातावरणातही सर्वेक्षणात सहभाग घेतला. काही गावांत संसाराचा गाडा ओढतानाच समृद्ध गावासाठी पती-पत्नीनेही या कामांत महत्त्वाची भूमिका वठविली. त्यामुळे या टप्प्यात मंगरुळपीर तालुक्यातील १९ पैकी १५ गावे सत्कारासाठी पात्र ठरली. या गावांचा २२ मार्चरोजी ऑनलाईन पद्धतीने पाणी फाऊंडेशनकडून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान, वाशिम जिल्ह्यातील पाणी फाऊंडेशनची टीम, सहभागी गावांचे नोडल अधिकारी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांची उपस्थिती होती.

--------

सत्कार झालेल्या गावांची नावे

१) लखमापूर ९) जनुना बु.

२) बोरव्हा १०) सायखेडा

३) घोटा ११) पिंप्री खु.

४) तपोवन १२) स्वासिन

५) लाठी १३) शेंदुरजना मोरे

६) जांब १४) पारवा

७) पिंपळखुटा १५) उमरी बु.

८) जोगलदरी

Web Title: Outstanding performance of 15 villages in Samriddha Gaon Mini Competition