पोहरादेवीत कोरोनाचा प्रकोप; प्रतिबंधित क्षेत्र घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:39 IST2021-05-15T04:39:07+5:302021-05-15T04:39:07+5:30

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गत १५ दिवसांत १०० च्या आसपास रुग्ण आढळून आल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य ...

Outbreak of corona in Pohardevi; Restricted area declared | पोहरादेवीत कोरोनाचा प्रकोप; प्रतिबंधित क्षेत्र घोषित

पोहरादेवीत कोरोनाचा प्रकोप; प्रतिबंधित क्षेत्र घोषित

श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गत १५ दिवसांत १०० च्या आसपास रुग्ण आढळून आल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभाग सतर्क झाला असून, तहसीलदार शारदा जाधव यांनी पोहरादेवी गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे आदेश काढून या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी मानोरा पोलीस ठाणे व गटविकास अधिकारी यांनी करावी, अशा सूचना दिल्या. बाधित व्यक्ती समुदायाच्या केंद्रबिंदूपासून ३ किलोमीटरच्या परिसरापर्यंत नागरिकांची हालचाल, फिरणे, संपर्क यांवर निर्बंध घालून मज्जाव करणेबाबत निर्देश दिले. गावातील इतर नागरिकांना या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांना हालचाल, फिरणे यावर निर्बंध लावले आहेत.

०००

कोट

गावात कोरोना रुग्ण वाढत असल्याने तहसीलदार यांनी हा निर्णय घेतलेला आहे. लोकांनी नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा व विनाकारण बाहेर फिरू नये याकरिता ग्रामपंचायत प्रयत्न करीत आहे.

- लक्ष्मीबाई शामराव खंडारे

सरपंच, ग्रामपंचायत, पोहरदेवी

Web Title: Outbreak of corona in Pohardevi; Restricted area declared