पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडून राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:31 IST2017-09-05T00:31:22+5:302017-09-05T00:31:40+5:30
नगर परिषदेत मुख्याधिकार्यांच्या कक्षातील नाम फलकांवर राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर करण्यात आला आहे. या संदर्भात मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी पंतप्रधानाकडे तक्रार करून हा फलक पंचनामा करुन हटविण्यासह दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पालिकेच्या मुख्याधिकार्यांकडून राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : येथील नगर परिषदेत मुख्याधिकार्यांच्या कक्षातील नाम फलकांवर राष्ट्रचिन्हाचा नियमबाह्य वापर करण्यात आला आहे. या संदर्भात मानवाधिकार कार्यकर्ते सचिन कुळकर्णी यांनी पंतप्रधानाकडे तक्रार करून हा फलक पंचनामा करुन हटविण्यासह दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
मार्च २0१७ मध्ये मंगरुळपीर नगरपालिकेतील मुख्याधिकार्यांच्या कक्षात त्यांच्या आसनाच्या मागील बाजूला भिंतीवर दर्शनी भागात मुख्याधिकारी नामफलक लावलेला आहे. या नाम फलकावर राष्ट्रचिन्हाचा अवमान होणारे चिन्ह रेखाटलेले आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेला ४ ऑक्टोबर २00७ च्या भारताच्या राज्य संप्रतीक प्रयोगाचे विनियम कायद्यातील नियम १0 (२) नुसार राष्ट्रचिन्ह वापरास निर्बंध आहे, तसेच मु ख्याधिकारी, २३ जुलै २0१0 च्या भारताचे राज्य संप्रतीक प्रयोगाचे विनियम संशोधन कायद्याच्या कलम ३ (आय) नुसार राजपत्रीत अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून होणारा राष्ट्रचिन्हाचा वापर अनुचीत ठरतो.
विशेष म्हणजे भारताचे राज्य संप्रतीक अनुचित प्रयोग २00५ च्या कायद्यानुसार कलम ६ मधील २ (ख) नुसार मुख्याधिकारी कक्षातील राष्ट्रचिन्हाचे स्वरूपही अपूर्ण असून, त्यावर सत्यमेव जयते हे बोधवाक्य वगळले आहे.
उद्देश नव्हता. आपल्यापूर्वी येथे मुख्याधिकारी पदाचा प्रभार सांभाळणार्या अधिकार्यांनी हा फलक लावला आहे. तथापि, या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर आजच तो नामफलक आम्ही हटविला आहे.
-श्रीकृष्ण वाहूरवाघ
मुख्याधिकारी, नगर परिषद मंगरुळपीर
-