शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७३ पैकी ४८३ शाळा ‘प्रगत’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:04 IST

वाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे.

ठळक मुद्दे प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले आहे. उर्वरीत २९० शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी डी.ए. तुमराम यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात शिक्षण विभागाच्यावतीने आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात आल्या असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करणे बाकी आहे.बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी तसेच शिक्षण क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे कार्यवाही सुरू असून, आतापर्यंत ७७३ पैकी ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले आहे. शाळा बोलक्या करण्यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. मूलभूत क्षमतेत ७५ टक्के गुण व अभ्यासक्रमावर आधारीत ६० टक्के गुण घेणाºया विद्यार्थ्यास प्रगत समजले जाते. ६ ते १४ वयोगटातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भिती नाहीसी करणे, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शैक्षणिक साहित्यावर भर, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, विद्यार्थ्यांना कृतीद्वारा शिक्षण देणे, कठिण विषयाविषयी आवड निर्माण करणे, शाळा सुंदर करून विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहेत. या निकषांच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा प्रगत करण्यासाठी शिक्षकांना योग्य त्या सूचना दिल्या. केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांच्या सहकार्यातून आतापर्यंत ४८३ शाळा प्रगत करण्यात यश मिळाले असून, उर्वरीत २९० शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी डी.ए. तुमराम यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा