वाशिम पालकमंत्र्यांनी घेतला खरिपपूर्व आढावा

By Admin | Updated: May 20, 2014 22:44 IST2014-05-20T21:56:41+5:302014-05-20T22:44:00+5:30

वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मनोहर नाईक यांनी आज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरिपूर्व आढावा बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला.

The original review carried by the Guardian of Washim | वाशिम पालकमंत्र्यांनी घेतला खरिपपूर्व आढावा

वाशिम पालकमंत्र्यांनी घेतला खरिपपूर्व आढावा

वाशिम : जिल्ह्याचे पालकमंत्री मनोहर नाईक यांनी आज स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या खरिपूर्व आढावा बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश डहाके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सोनाली जोगदंड, जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी, अतिरिक्त पोलिस अधिक्षक तुषार पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती हेमेंद्र ठाकरे, अधिक्षक कृषी अधिकारी आर.सी.जाधव उपस्थित होते. बैठकीत जिल्हा कृषी अधिक्षक हिंदूराव चव्हाण यांनी सन २0१४ मधील जिल्हयातील पेरणी क्षेत्र व खरिप हंगामाच्या नियोजनाचा आढावा सादर केला. या नूसार यावर्षी एकूण ४३३४00 हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी प्रस्तावित आहे. यासाठी जिल्हयाला १0३१२५ क्विंटल बियाण्याची मागणी असून महाबिज व एनएससी मार्फत ८४८७ क्विंटल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने महाबिजकडे ५0000 क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. मात्र खराव हवामानामुळे यावर्षी बियाण्याचा तुटवडा आहे. शेतकर्‍यांनी स्वत:जवळील बियाण्याचा वापर करण्याची आवयश्कता असून कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना त्यासंबंधी जनजागृती करुन बियाणे निवडीसाठी प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच सोयाबिन व्यतिरिक्त इतर सर्व बियाण्याचा व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती चव्हाण यांनी सभागृहाला दिली.वाशिम जिल्हा व सोयाबिन उत्पादनात अग्रेसर असून जिल्हयातील शेतकर्‍यांचे सोयाबिन हेच प्रमुख पिक असल्याने प्रशासनाने शेतकर्‍यांना सोयाबिनच्या बियाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना पालकमंत्री नाईक यांनी दिल्या. गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून सक्तीने कर्ज वसुली कररु नये तसेच त्यांना मिळणार्‍या मदतीत परस्पर कपात करु नये अशा सुचना सर्व बॅकांना दिल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुळकर्णी यांनी यावेळी दिली.

Web Title: The original review carried by the Guardian of Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.