मानोरा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:39 IST2021-02-12T04:39:26+5:302021-02-12T04:39:26+5:30
ही रॅली शिवाजी चौक, दिग्रस चौक, रामदेव पेट्रोलपंप, जुना मार्केट, परत त्याच मार्गाने हेमेंद्र ठाकरे यांचा पेट्रोलपंप, तेथून परत ...

मानोरा येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
ही रॅली शिवाजी चौक, दिग्रस चौक, रामदेव पेट्रोलपंप, जुना मार्केट, परत त्याच मार्गाने हेमेंद्र ठाकरे यांचा पेट्रोलपंप, तेथून परत खुपसे सेलिब्रेशन हॉल या ठिकाणी स्पर्धेचा समारोप होईल. ही स्पर्धा खुला गट, १० ते १७ वर्ष गटांमध्ये घेण्यात येईल. मुलींसाठीसुद्धा या वर्षी विशेष तीन किलोमीटरची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून महंत संजय दशरथ महाराज, ठाणेदार मानकर मानोरा, गोर सिकवाडी सहसंयोजक अनिल जयराम राठोड, भोजराज खुपसे, डॉ. नितीन राठोड, राजू ठाकरे, वसंत राठोड, डॉ. महेश राठोड, जगदीश जाधव, ग्रामीण रुग्णालय मानोरा डॉ. नीलेश आडे, संतोष आडे, मनोज रामावत, गोर सेना तालुका अध्यक्ष गोपाल चव्हाण, रणजीत वडतीया, गजानन होळकर, डी.पी. ठाकरे, नरेंद्र ठाकरे, चंदन राठोड, इंद्रजीत चव्हाण, बन्सी चव्हाण, देवेंद्र काळे, नितेश लवटे, जय प्रकाश गायकवाड, राजू लोंढे, तुकाराम केंद्रे व सर्व स्पोर्ट टीचर यांचे विशेष मार्गदर्शन या स्पर्धेला मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.