आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सरसावल्या संघटना !
By Admin | Updated: June 23, 2017 16:04 IST2017-06-23T16:04:08+5:302017-06-23T16:04:08+5:30
एका महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या.

आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी सरसावल्या संघटना !
मंगरुळपीर: एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी विविध सामाजिक संघटना सरसावल्या असून, उपविभागीय अधिकारी व मंगरूळपीर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
१७ जून रोजी मंगरुळपीर येथील महिलेचा विनयभंग करुन गुंड प्रवृत्तीच्या नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे फिर्यादी महिलेच्या कुटुंबाच्या जिवित्वास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोपीस त्वरीत अटक करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. अन्यायग्रस्त कुटुंबाला स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विजय सोनोने, सुरेश ताटके, गजानन मोरे, विनोद ताटके, राहुलदेव मनवर, देवानंद ताटके, भारत वरघट, राजेश ताटके, बाळू खडसे, लक्ष्मण नवघरे, विठ्ठल ताटके यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.