मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश
By Admin | Updated: February 7, 2015 02:14 IST2015-02-07T02:14:29+5:302015-02-07T02:14:29+5:30
वाशिम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिक-याचे आदेश.

मुख्याध्यापकास निलंबित करण्याचे आदेश
वाशिम: मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कुरळा येथील प्रभारी मुख्याध्यापक राठोड एन.बी. राठोड यांना विविध कारणावरून महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम १९६७ (३) तसेच शिस्त व अपिल नियम १९६४ (३) अन्वये ३ फेब्रुवारी रोजी निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण विभागाला दिले. कुरळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक एन.बी. राठोड शालेय पोषण आहार निकषानुसार न ठेवणे, शाळेत वेळेवर न येणे, शालेय व्यवस्थापन समितीची सभा न घेणे, आर्थिक रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे व अफरातफर करतात. याबाबत सरपंचा अलका सुनील घुगे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजाननराव घुगे व व्यवस्थापन समिती सदस्य, माजी अध्यक्ष राजेश घुगे, दादाराव घुगे यांनी जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा रमाकांत घुगे यांच्याकडे तका्रर दाखल केली होती. याबाबत रत्नप्रभा घुगे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे कडे तक्रार सादर करून कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वाशिम यांनी केलेल्या चौकशीवरून सादर करण्यात आलेल्या अहवालात आरोप सिद्ध होत असल्याचे म्हटले. या अहवालावरून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर आदेश दिले.