निकृष्ट विकास कामाच्या चौकशीचे आदेश

By Admin | Updated: August 2, 2014 23:19 IST2014-08-02T23:19:03+5:302014-08-02T23:19:03+5:30

ग्राम विकास अधिकारी मार्फत गावामध्ये करण्यात आलेल्या निकृष्ट विकास कामांची व ग्राम पंचायतच्या अनागाेंदी कारभाराची चौकशी

Order for poor development work | निकृष्ट विकास कामाच्या चौकशीचे आदेश

निकृष्ट विकास कामाच्या चौकशीचे आदेश

शिरपूरजैन : शिरपूर येथील सरपंच, ग्राम विकास अधिकारी मार्फत गावामध्ये करण्यात आलेल्या निकृष्ट विकास कामांची व ग्राम पंचायतच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्याची मागणी ८ ग्राम पंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून या प्रकरणाची चोकश्ीा गट विकास अधिकार्‍यामार्फत तात्काळ करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. शिरपूर हे पर्यटन क्षेत्र असल्याने येथील विकास कामासाठी शासनाच्या विविध योजनामार्फत मोठा निधी ग्राम पंचायतला मिळत असतो. या निधीतून गावामध्ये सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत विकास कामे केली जात असतात. परंतु मागील काही दिवसापूर्वी पशु वैद्यकीय केंद्राची दुरुस्ती करण्यासाठी ४ लाखाचा निधी खर्च करण्यात आला. दुरुस्तीचे काम निकृष्ठ करण्यात आले. वार्ड नं ३ मधील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्या, मुस्लीम स्मशानभूमी सरंक्षण भिंत, अल्पसंख्याक निधीतील सिमेंट रस्ता, यासह इतर कामांची चौकशी करण्यात यावी असा ठराव ८ सदस्यांनी ३१ जुलै रोजी मासिक सभोत मांडून यापूर्वी घेतलेल्या ग्रामसभेची माहिती मागीतली. सदस्यांचा हा ठराव/ सरपंच/ सचिवांनी फेटाळून लावला. व ग्राम सभेची माहिती साठी रजिस्टर वाशिम येथील ग्राम सचिवांच्या घरी असल्याचे गा्रमसचिवांनी सांगितले. यावर ग्राम सदस्य आक्रमक झाल्याने ग्राम पंचायतचे कर्मचारी वाशिमला पाठवून रजिस्टर मागविण्यात आले. त्यावर २६ जानेवारी नंतर ग्राम सचिवांनी सभापूर्ण करताच ग्राम पंचायत मधून निघ्ज्ञून गेले यामुळे गणेश भालेराव, अशोक भालेराव, विकास चोपडे, नंदकिशोर गोरे, भगवान धिरके, डॉ.गजानन ढवळे, चंदू रेघीवाले, बाळासाहेब देशमुख या ग्रामपंचायत सदस्यांनी १ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे ग्राम पंचायतच्या निकृष्ट कामाची व अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. यावर जिल्हाधिकार्‍यांनी जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना गटविकास अधिकार्‍यांचा मार्फत या प्रकरणाची चौकशी तात्काळ करण्याचे आदेश दिले याबबत चौकशी करण्यात यावी म्हणून पं.स.सदस्या शिल्पा देशमुख, कल्पना अभोरे, यांनी मागील पं.स.च्या मासीक सभेत ठराव मांडला होता. तर जि.प.सदस्याशबनाबी मो.ईमदाद यांनी जि.प.मध्ये सुध्दा चौकशी करण्याची मागणी तिन महिन्यापूर्वीच केली होती. तर १५ दिवस पूर्वी संतोष नामदेव भालेराव या युवकांनी पशु वैद्यकीय केंद्र दुदुस्ती कामाची चौकशी करण्याची मागणी जि.प.चे अभियंत्याकडे केली होती.

Web Title: Order for poor development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.