दागडीयाच्या अटकपूर्व जामिनाचा आदेश राखीव
By Admin | Updated: May 28, 2014 00:34 IST2014-05-27T22:55:23+5:302014-05-28T00:34:54+5:30
दागडीयाच्या अटकपूर्व जामिनाचा आदेश राखीव; निर्णय २८ मे रोजी अपेक्षीत.

दागडीयाच्या अटकपूर्व जामिनाचा आदेश राखीव
वाशिम : शेतकर्यांची लुबाडणूक करण्याच्या हेतूने कोट्यावधी रूपयाच्या खताची अवैधरित्या साठेबाजी करणार्या विजयकुमार उर्फ महिद्रा दागडीया याच्या अटकपूर्व जामिनाचा निकाल न्यायालयाने आज राखून ठेवला आहे. आता २८ मे रोजी यावर निर्णय होणार असल्याची शक्यता विधी क्षेत्रात वर्तविण्यात येत आहे. . दागडीया यांचे पंचाळा फाटा व काटा रोडवर गोडाऊन आहेत. या गोडाऊन मध्ये कोरोमंडल कंपनीच्या खताचा मोठय़ा प्रमाणात साठा असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कृषी विभागाने गोदामची तपासणी केली. त्या ठिकाणी एक कोटी ६८ लाख ४ ५ हजार रुपए किमंतीचे ८८४ मॅट्रीक टन खत आढळून आले. जीवनावश्यक वस्तू कायदयानुसार व इतर अनेक कायदयान्वये विजयकुमार उर्फ महिंद्रा दागडीया व कोरोमंडल कंपनीच्या अधिकार्यांविरूध्द वाशिम शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर दागडीया गायब झाले.मात्र, त्यांनी वाशिम येथील न्यायालयात अटकपुर्व जामीन घेण्यासाठी अर्ज दाखल केला. ह्यदागडीया यांना जामीन देण्यात येऊ नये ह्ण यासाठी पोलिस निरिक्षक वा.तु. वांढरे यांनी २३ मे रोजी ह्यसेह्ण दाखल केला. न्यायालयाने दाबडीयार्च्या जामीनावरील सुनावनीसाठी २७ मे ही तारीख ठेवली होती. परंतु आज काही तांत्रिक कारणामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही. आता या प्रकरणी २८ मे रोजी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.