शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
2
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
3
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
4
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
5
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
6
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
7
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
8
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
9
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
10
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
11
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
12
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
13
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
14
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
15
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
16
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
17
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
18
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
19
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
20
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...

दुष्काळी परिस्थितीतही फुलविली संत्रा बाग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 12:50 IST

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे.

- यशवंत हिवराळे

 राजुरा: पाच किमी अंतरावरून पाणी आणत राजूरा येथील उपक्रमशील शेतकºयाने दुष्काळी परिस्थितीतही संत्रा बाग फुलविली आहे. याबरोबरच फळबाग, भाजीपाला उत्पादन घेऊन त्यांनी इतर शेतकºयांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शिवाजी सोनोने असे या उपक्रमशील शेतकºयाचे नाव आहे.मालेगाव तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीच गाव असलेल्या राजूरा येथे नेहमीच पाणीटंचाई जाणवते. त्यामुळे शेतकºयांना अपेक्षीत उत्पादन घेता येत नाही. खरिपाचे पीक घेतल्यानंतर पाण्याअभावी अनेक शेतकºयांची जमिन विनापेरणी तशीच पडून राहते तर काही उपक्रमशील शेतकरी वेगळ्या पद्धतीची शेती करून भरघोष उत्पन्न घेत असल्याचेही आशावादी चित्र आहे. यामध्ये शिवाजी महादजी सोनोने यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शिक्षण शास्त्र पदवी घेतलेल्या सोनोने यांनी काही काळासाठी विनाअनुदानित शाळेवर नोकरी सुध्दा केली. मात्र वडीलोपार्जीत शेती व्यवसायाशी  कुटूंबाची जुळलेली नाळ व त्यातुन मातीशी जुळलेला नळा त्यांना शेती व्यवसायाकडे घेवुन गेला.  त्यांनी नोकरीचा राजीनामा देत शेतीमध्येच करीअर करण्याची खुनगाठ बांधुन  स्वत:ला शेती व्यवसायात झोकुन दिले. सुरुवातीच्या काळात त्यांनी आधुनिक पध्दतीने काशीफळ, आलु, हळद, कांदा इत्यादी पिकांचे विक्रमी उत्पादन घेवुन परिसरातील शेतकºयांसाठी एक आदर्श निर्माण केला. जवळपास ३५ वर्षापासुन ते संत्रा उत्पादन घेत आहेत. चार एकर क्षेत्रफळावर त्यांनी ७०० पेक्षा अधिक संत्रा झाडाची जोपासना केली आहे. अलिकडच्या काळात पाणीटंचाई जाणवत असल्याने त्यांनी पाच किमी अंतरावरील चाकातिर्थ संग्राहक तलावावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणले आहे. यावर्षी भीषण पाणीटंचाई असतानाही सोनोने यांनी संत्रा बाग फुलविली आहे. चालु वर्षी त्यांनी या बागेतुन जवळपास तीस टनावर संत्रा फळाचे उत्पादन घेतले असुन त्यापासुन सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी