गट शेती वाढविणार संत्रा पिकाचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST2021-09-25T04:45:16+5:302021-09-25T04:45:16+5:30

बेलखेडा येथे आयोजित कार्यक्रमांतर्गत न संत्रा शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलखेडाचे सरपंच मधुकर देव्हडे, ...

Orange crop production to increase group farming | गट शेती वाढविणार संत्रा पिकाचे उत्पादन

गट शेती वाढविणार संत्रा पिकाचे उत्पादन

बेलखेडा येथे आयोजित कार्यक्रमांतर्गत न संत्रा शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलखेडाचे सरपंच मधुकर देव्हडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्यानविद्या तज्ज्ञ निवृत्ती पाटील हे होते. बेलखेडा गावातील समस्त संत्रा उत्पादक व परिसरातील इतर गावांचे संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या उपस्थित होते. यावेळी कामांचे नियोजन करण्यात आले. बागांच्या निरीक्षणाच्या आधारे निवृत्ती पाटील यांनी संत्रा पिकातील डिंक्या रोगाचे नियंत्रण व उपाययोजना, छाटणीचे नियोजन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, फळांची प्रत सुधारण्यासाठीच्या उपाययोजना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले. सोबतच जुने बागाईतदार विठ्ठल जाधव आणि वसंता देव्हडे यांनी आपले संत्रा पिकाविषयीचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळूभाऊ ठाकरे यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार देव्हडे यांनी केले.

Web Title: Orange crop production to increase group farming