सार्वजनिक शौचालयाला स्थानिकांचा विरोध

By Admin | Updated: May 12, 2017 13:18 IST2017-05-12T13:18:53+5:302017-05-12T13:18:53+5:30

शौचालयाच्या बांधकामाला स्थानिक नागरीकांनी विरोध केला असून सदर शौचालय झाल्यास जनतेच्या आरोग्यास धोका उद्भवू शकते.

Opposition to the public toilets | सार्वजनिक शौचालयाला स्थानिकांचा विरोध

सार्वजनिक शौचालयाला स्थानिकांचा विरोध

शौचालय बांधकाम रद्द करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
वाशीम : शहराच्या शुक्रवारपेठ भागातील जुन्या ढोर दवाखान्याजवळ बांधण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामाला स्थानिक नागरीकांनी विरोध केला असून सदर शौचालय झाल्यास जनतेच्या आरोग्यास धोका उद्भवू शकते. त्यामुळे या सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम रद्द करण्याची मागणी येथील नागरीकांनी केली असून त्यासंदर्भात सामाजीक कार्यकर्ते प्रशांत भडके यांच्या नेतृत्वात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना  निवेदन दिले आहे.

Web Title: Opposition to the public toilets