अंगणवाडी भरते उघड्यावर

By Admin | Updated: December 3, 2014 23:45 IST2014-12-03T23:45:19+5:302014-12-03T23:45:19+5:30

मालेगावातील ईमारत बांधकाम रखडले.

Opening of Anganwadi fills | अंगणवाडी भरते उघड्यावर

अंगणवाडी भरते उघड्यावर

मालेगाव (वाशिम) : विद्यार्थ्यांना लहान वयातच शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून 0 ते ६ वयोगटातील लहान बालकांसाठी अंगणवाडी सुरु करण्यात आल्या आहेत. मात्र स्थानिक राजकारण व अ र्थकारणाच्या कचाटयामुळे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. मालेगावातील अंगणवाडी क्र.१0 हा त्याचाच १ भाग असून तेथील बांधकाम रखडल्यामुळे विद्यार्थ्यांना चक्क उघडयावर ज्ञानर्जन करावा लागते तर उघडयावरच पोषण आहार घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.
मालेगाव शहरात एकूण १0 अंगणवाडया आहेत. त्यापैकी अंगणवाडी क्रमांक १0 अकोला फाटयावरील गाडगेबाबा नगर येथे आहे. ६ जून २0११ पासून त्या अंगणवाडयांचे बांधकाम सुरु झाले आहे. मात्र अद्यापही त्या अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. यावर्षी त्या ठिकाणी 0 ते ६ वयोगटातील १९७ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. त्यामधील ३ ते ६ वयोगटातील १९७ विद्या र्थ्यांची नोंद झाली आहे. त्यामधील ३ ते ६ वयोगटातील १0७ विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना हक्काची सुव्यवस्थित जागाच नसल्याने विद्यार्थीही येण्याचे टाळतात. पर्यायाने त्यांच्या वेटाळात जाऊन पोषण आहार वाटावा लागतो व त्यामुळे विद्यार्थ्यांना उघडयावरच पोषण आहार घ्यावा लागतो. याबाबत वारंवार सांगूनही अधिकारी, लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत.

Web Title: Opening of Anganwadi fills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.