लाखोंच्या लोखंड चोरीचे ‘पितळ’ उघडे

By Admin | Updated: May 25, 2015 02:47 IST2015-05-25T02:47:18+5:302015-05-25T02:47:18+5:30

एसपी पथकाची कारवाई ; तीन आरोपी अटकेत

Open the 'brass' of millions of iron stolen | लाखोंच्या लोखंड चोरीचे ‘पितळ’ उघडे

लाखोंच्या लोखंड चोरीचे ‘पितळ’ उघडे

वाशिम : लोखंडाची वाहतूक करणार्‍या ट्रकचालकांच्या लोखंड चोरीचा भंडाफोड पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या विशेष पथकाने २४ मे रोजी केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींकडून अंदाजे २२ लाख रुपये किमतीचे ५0 टन लोखंड हस्तगत केले. पोलीस अधीक्षक साहू यांना गुप्त सूत्रांकडून ट्रकचालक आपल्या ट्रकमधून लोखंड विक्री करण्याचा गोरखधंदा करीत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक साहू यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस उपनिरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात संदीप इढोळे, विनोद अवगळे, बद्धु रेघीवाले, राहुल व्यवहारे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सोळंके, स्वप्निल शेळके, अविनाश इंगोले, आमिर खान व मुख्यालयातील पोलीस कर्मचारी यांचा समावेश असलेल्या पथकाला शेलूबाजार ते कारंजा मार्गावर असलेल्या वेगवेगळ्या ढाब्यावर छापे टाकण्याचे निर्देश दिले. या पथकाने पंजाबी ढाबा, नागपूर-पुणे हायवे ढाबा व न्यू जम्मू पंजाबी ढाबा या तीन ठिकाणी छापे टाकून ५0 टन लोखंड हस्तगत केले. चोरीच्या मार्गाने लोखंड खरेदी करण्याचा गोरखधंदा करणार्‍या तीन आरोपींना पोलीस पथकाने रंगेहात पकडले. यामध्ये मुंबई येथील लालचंद मनोहर जयस्वाल, फतेहपूर उत्तरप्रदेशमधील खुर्शिद समीम खान, इंदूरमधील मोहम्मद सुभान गोरी या तिघांना ताब्यात घेतले. या तिघांविरुद्ध कारंजा ग्रामीण व मंगरूळपीर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंंत सुरू होती. पोलीस अधीक्षकांच्या या कारवायांमुळे अवैध व्यावसायिक व चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Open the 'brass' of millions of iron stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.