‘अंनिस’चे विवेकी विचारच देशाला तारू शकतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:56+5:302021-09-09T04:49:56+5:30

याप्रसंगी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची जिल्हा शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. रामकृष्ण कालापाड, तर कार्याध्यक्षपदी पी. एस. खंदारे ...

Only the prudent thoughts of 'Annis' can save the country | ‘अंनिस’चे विवेकी विचारच देशाला तारू शकतात

‘अंनिस’चे विवेकी विचारच देशाला तारू शकतात

याप्रसंगी अंधश्रध्दा निर्मूलन समितीची जिल्हा शाखा कार्यकारिणी गठित करण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी डॉ. रामकृष्ण कालापाड, तर कार्याध्यक्षपदी पी. एस. खंदारे यांची निवड करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

प्रा. कानकिरड म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या त्यागातून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नात जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा पारित करण्यात आला. या संघटनेत युवक, युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सामाजिक समतेचा संदेश देणारे शाहीर दतराव वानखेडे व गायिका कुसूम यांनी गायन केले. प्रास्ताविक व संचालन खंदारे यांनी केले. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष डॉ. महादेव डाखोरे, दिनकर बोडखे, प्रधान सचिव बालाजी गंगावणे, विविध उपक्रम विभाग कार्यवाह सुनील वैद्य, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प विभाग कार्यवाह प्रा. ऊन्मेश घुगे, बुवाबाजीविरोधी संघर्ष विभाग कार्यवाह दतराव वानखेडे, प्रशिक्षण विभाग कार्यवाह नाजुकराव भोंडणे, महिला विभाग प्रमुखपदी कुसूम सोनुने, युवा विभाग कार्यवाह नीलेश भोजणे, मानसिक आरोग्य विभाग कार्यवाह डॉ. मंगेश राठोड, कायदेविषयक सल्लागार ॲड. दीपाली शृंगारे, आंतरजातीय विवाह विभाग प्रमुख राम शृंगारे आदींची निवड केली.

Web Title: Only the prudent thoughts of 'Annis' can save the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.