शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच मिळणार रेमडेसिविर इंजेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 12:16 IST

Remedesivir injection : कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असून, यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला. इंजेक्शनचा अवाजवी वापर टाळण्याचे आवाहनही आरोग्य विभागाने केले.जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांवर योग्य उपचार व्हावे यासाठी सरकारी कोविड केअर सेंटरबरोबरच जवळपास १२ खासगी कोविड हॉस्पिटललादेखील परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने साहजिकच रेमडेसिविर इंजेक्शनचा वापरही वाढला आहे. गत १० दिवसांत रेमडेसिविर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांसह नातेवाईकांनादेखील मनस्ताप सहन करावा लागला. रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची सही, शिक्क्यानिशी चिठ्ठी तसेच रुग्णाचा आरटी-पीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल, रुग्णाचे आधार कार्ड आदी बाबी बंधनकारक करण्यात आल्या; मात्र कोविड हॉस्पिटलमध्येच रुग्ण भरती असावा, अशी अट सुरुवातीला नसल्याने रेमडेसिविर इंजेक्शन नॉन कोविड रुग्णालयाशी संलग्नित असलेल्या मेडिकलमध्येदेखील उपलब्ध होत होते. कोविड रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांशिवाय नॉनकोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होत असल्याने कृत्रिम तुटवडा जाणवत असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊल उचलत यापुढे कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांनाच इंजेक्शन पुरविण्याचा निर्णय घेतला. नॉन कोविड हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या चिठ्ठीवर तसेच नॉन कोविड हॉस्पिटलमधील कोणत्याही रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन देऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या. (प्रतिनिधी)

आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावेकोरोना रुग्णाला खरोखरच रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असेल तरच डॉक्टरांनी इंजेक्शन द्यावे. सरकारी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना आवश्यकतेनुसारच इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे खासगी कोविड हॉस्पिटलमध्येदेखील आवश्यकता असेल तरच इंजेक्शन द्यावे, अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

कोविड हॉस्पिटलमधील रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्यात यावे तसेच नॉन कोविड रुग्णालयाशी संबंधित मेडिकलमध्ये इंजेक्शन देण्यात येणार नाहीत. रुग्णांनीदेखील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे.  रेमडेसिविर इंजेक्शनचा यापुढेही तुटवडा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस