रेल्वे स्थानकावर दहापैकी केवळ एकाजवळ प्लॅटफाॅर्म तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:44 IST2021-08-27T04:44:01+5:302021-08-27T04:44:01+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : प्रवाशासाेबत किंवा काहीही कामानिमित्त रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅर्मवर जायचे असल्यास नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे आवश्यक ...

रेल्वे स्थानकावर दहापैकी केवळ एकाजवळ प्लॅटफाॅर्म तिकीट
नंदकिशोर नारे
वाशिम : प्रवाशासाेबत किंवा काहीही कामानिमित्त रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅर्मवर जायचे असल्यास नागरिकांना प्लॅटफाॅर्म तिकीट काढणे आवश्यक आहे. परंतु वाशिम येथील रेल्वे स्थानकावर याची पाहणी केली असता, दहापैकी केवळ एकाजवळच प्लॅटफाॅर्म तिकीट असल्याचे निदर्शनास आले आहे.
रेल्वे स्थानकावर दाेन तासासाठी ३० रुपये दिल्यानंतर प्लॅटफाॅर्म तिकीट देण्यात येते. परंतु हे तिकीट काेणीच घेत नसून रेल्वे स्थानकावर बिनधास्तपणे विना प्लॅटफाॅर्म तिकीट फिरताना लोक दिसून येतात. रेल्वे प्रशासनाकडूनही याची पाहणी हाेत नसल्याने, काेणीही विचारणा करीत नसल्याने रेल्वेचे नुकसान हाेत असल्याचे दिसून येत आहे.
--------------
प्लॅटफाॅर्मवर विनातिकीट फिरणारे काय म्हणतात...
नागरिक १ --- नातेवाईकाला साेडण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागतात. यासाठी ३० रुपये जास्त आहेत. तसेही काेण विचारणा करतेय?
नागरिक २ --- मी नेहमीच येथे असताे. माझा ऑटाेचा व्यवसाय आहे. प्रवासी आल्यानंतर त्यांना शहरात घेऊन जाताे. येथे काेणी विचारणा करीत नाही.
---
प्लॅटफाॅर्म तिकिटाविना प्रवेश न करण्याचे आवाहन
रेल्वे स्थानकावर पार्सल घेण्यासाठी किंवा नातेवाईकांना साेडण्यासाठी यायचे असल्यास प्लॅटफाॅर्म तिकीट आवश्यक आहे. प्लॅटफार्म तिकीट न काढल्यास दंड हाेऊ शकताे. प्लॅटफाॅर्म तिकीटविना प्रवेश करू नये.
- टी. एम. उजवे, स्टेशन मास्तर, वाशिम
---
प्रवाशांपेक्षा रिकामे फिरणाऱ्यांचीच गर्दी
वाशिम येथील रेल्वे स्थानकावर प्रवाशांपेक्षा रिकामे फिरणाऱ्यांचीच गर्दी जास्त दिसून आली. यावेळी काही जणांना प्लॅटफाॅर्म तिकीट कुठे मिळते व आपण काढले का, याची विचारणा केली असता, प्लॅटफार्म तिकीट कशाला हवे, असा प्रश्न करण्यात आला.
वाशिम फार माेठे रेल्वे जंक्शन थाेडेच आहे? की येथे काेणी विचारणा करते. तिकीट काढण्याची काहीच गरज नसल्याचे येथे रिकामे फिरणाऱ्यांनी सांगितले.