पहिल्या दिवशी केवळ एक उमेदवारी अर्ज
By Admin | Updated: December 11, 2015 02:30 IST2015-12-11T02:30:56+5:302015-12-11T02:30:56+5:30
मालेगाव व मानोरा नगर पंचायत निवडणूक.

पहिल्या दिवशी केवळ एक उमेदवारी अर्ज
मालेगाव/मानोरा (जि. वाशिम): मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत १0 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला असून, पहिल्या दिवशी मानोर्यातून केवळ एक अर्ज दाखल झाला. मानोरा व मालेगाव नगर पंचायत निवडणुकीत राजकीय वातावरण तापले असून, प्रत्येक जण आघाडीची भाषा बोलत असल्याने सध्या तरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट आहे. गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली. मालेगाव नगर पंचायतमध्ये एकही अर्ज दाखल झाला नाही. मानोरा नगर पंचायतच्या वार्ड १३ मधून विशाल विजय भगत यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. मालेगाव येथे अनेकांकडून सध्या आघाडी व युतीची बोलणी सुरू असल्याने पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल होऊ शकला नसल्याचे बोलले जाते. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत तहसीलमध्ये आणून द्यावयाची आहे. निवडणूक काळात फिरते पथक स्थापन करण्यात आले आहे. निवडणूक खर्चाची र्मयादा दीड लाखापर्यंंत असून, त्याचा हिशेब दररोज देणे बंधनकारक आहे. राखीव जागांवर अर्ज भरणार्या उमेदवारांना जात पडताळणी किंवा हमीपत्र जोडावे लागणार आहे. मालेगाव येथे बबन चोपडे व गोपाल मानधने यांची आघाडी होण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे भाजपा स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरली असली तरी अंतिम क्षणी शिवसेनेसोबत युती होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची परिस्थिती आहे. काँग्रेस-राकाँने अद्याप पत्ते खुले केले नाहीत. .