‘आॅनलाईन’ कामकाजाचा बडगा; प्रशिक्षण मात्र मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:14 IST2017-09-28T19:12:48+5:302017-09-28T19:14:03+5:30

वाशिम: महसूल विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणा-या तलाठ्यांवर बदलत्या काळानुसार ‘हायटेक’ होण्याचा दबाव टाकला जात असून ‘आॅनलाईन’ पद्धतीने कामे करण्याचा बडगा उगारला जात आहे. असे असताना यासाठी आवश्यक ठरणारे प्रशिक्षण मात्र मिळत नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. 

'Online' works; Do not get training! | ‘आॅनलाईन’ कामकाजाचा बडगा; प्रशिक्षण मात्र मिळेना!

‘आॅनलाईन’ कामकाजाचा बडगा; प्रशिक्षण मात्र मिळेना!

ठळक मुद्देतलाठ्यांवर ‘हायटेक’ होण्याचा दबाव आवश्यक प्रशिक्षण मिळत नसल्याची ओरड

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: महसूल विभागातील महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणा-या तलाठ्यांवर बदलत्या काळानुसार ‘हायटेक’ होण्याचा दबाव टाकला जात असून ‘आॅनलाईन’ पद्धतीने कामे करण्याचा बडगा उगारला जात आहे. असे असताना यासाठी आवश्यक ठरणारे प्रशिक्षण मात्र मिळत नसल्याची ओरड तलाठ्यांमधून होत आहे. 
जिल्ह्यात ४९१ ग्रामपंचायती असून ८०९ महसूली गावे आहेत. त्यात २५६ तलाठी कार्यरत आहेत. असे असले तरी राष्ट्रीय भुमी अभिलेख आधुनिकीकरण आणि अभिलेखे डिजिटलायझेशन कार्यक्रमातंर्गत २५६ पैकी केवळ ८० तलाठ्यांनीच ‘लॅपटॉप’च्या माध्यमातून ‘आॅनलाईन’ कामकाज सुरू केले आहे. उर्वरित १७६ तलाठी मात्र आजही परंपरागत पद्धतीने कागदांवरील कामकाजात गुंतून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शासनाने कामकाजासाठी अत्यावश्यक असलेले लॅपटॉप देण्यासोबतच ‘आॅनलाईन’ कामकाजाचे अद्ययावत प्रशिक्षण वेळोवेळी पुरवायला हवे, अशी अपेक्षा तलाठ्यांमधून व्यक्त होत आहे. 

Web Title: 'Online' works; Do not get training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.