भाजीपाला, निर्जलीकरणातून स्वयंरोजगाराच्या संधीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:43 IST2021-03-23T04:43:39+5:302021-03-23T04:43:39+5:30

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या यांनी उपरोक्त विषयाच्या आनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर उपलब्ध तंत्रज्ञानाचा लाभ ...

Online training on vegetable, dehydration self-employment opportunities | भाजीपाला, निर्जलीकरणातून स्वयंरोजगाराच्या संधीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण

भाजीपाला, निर्जलीकरणातून स्वयंरोजगाराच्या संधीबाबत ऑनलाइन प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे यांच्या यांनी उपरोक्त विषयाच्या आनुषंगाने कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर उपलब्ध तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन ग्रामीण युवक व युवती यांनी भाजीपाला प्रक्रियेच्या माध्यमातून स्वयं रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन केले, तसेच कृषी विज्ञान केंद्रामध्ये याबाबत कौशल्यावर आधारित व्यावसायिक प्रशिक्षणाच्या सेवेचा लाभ घेण्याबाबतही त्यांनी आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी आहारात फळे व भाजीपाल्याचे महत्त्व पटवून देत भारत देश हा जगात फळे व भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असून, एकूण उतपादनाच्या १८ टक्के फळे व भाजीपाला अयोग्य हाताळणी व नाशवंत असल्यामुळे वाया जातो, त्यामुळे यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामीण भागात फळे व भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग फायदेशीर कसे ठरू शकते, हे पटवून दिले. शिवाय फळे व भाजीपाला तंत्रशुद्ध पद्धतीने वाळवून त्याचे पॅकिंग, ब्रँडिंग व मार्केटिंग कसे करायचे, याबाबत सादरीकरणातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस. आर. बावस्कर यांनी केले. या प्रशिक्षणास बहुसंख्येने शेतकरी तसेच शेतकरी महिला, ग्रामीण युवक व युवती उपस्थित होत्या.

Web Title: Online training on vegetable, dehydration self-employment opportunities