ऑनलाईन नाव नोंदणीनंतरच मिळणार वाहन चालविण्याचा परवाना
By Admin | Updated: September 1, 2014 23:35 IST2014-09-01T23:35:31+5:302014-09-01T23:35:31+5:30
बोगस लाभार्थ्यांना बसणार आळा

ऑनलाईन नाव नोंदणीनंतरच मिळणार वाहन चालविण्याचा परवाना
वाशिम: वाहन व चालकांच्या सुरक्षिततेसाठी नवनवे उपक्रम अमलात आणणार्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) लर्निंग लायसन्स (शिकाऊ अनुज्ञप्ती) मिळविण्याकरिता आता ऑनलाईन नावनोंदणीचा पॅटर्न अनिवार्य केला आहे. लर्निंग लायसन्स मिळविण्याकरिता द्याव्या लागणार्या परीक्षेसाठी उमेदवारांना ऑनलाईन नाव नोंदणी (अपाईंटमेंट) करणे बंधनकारक केले आहे. या नियमांची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून राज्यभरातील प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात होणार आहे.
रस्ते अपघाताची संख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून, चालकांची वाहतूक नियमांची उजळणी करून घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने ऑनलाईन चाचणी परीक्षा गत काही महिन्यांपूर्वी सुरू केली आहे. ही परीक्षा देण्यासाठी उमेदवार प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एकच गर्दी करतात. परिणामी, अनेकांना कार्यालयात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे वेळ तसेच ङ्म्रम वाया जातात. बरेचवेळा नागरिकांचा दिवस खर्ची पडतो. लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता उमेदवारांचा वेळ, पैसा व श्रम वाचविण्याच्या दृष्टिकोनातून ह्यऑनलाईन अपॉईन्टमेंटह्ण ही सुविधा अंमलात आणण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाच्या विचाराधीन होता. याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्त्वावर लर्निंग लायसन्सच्या परीक्षेकरिता ऑनलाईन नावनोंदणी करण्याची मुभा उमेदवारांना देण्यात आली आहे. ऑनलाईन नावनोंदणीद्वारे लर्निंग लायसन्ससाठी द्याव्या लागणार्या परीक्षेची तारीख व वेळ निवडण्याचे स्वातंत्र्य उमेदवारांना बहाल करण्यात आले होते. १ सप्टेंबर २0१४ पासून ऑनलाईन नावनोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाईन नाव नोंदणी केलेल्या उमेदवारांनाच लर्निंंग लायसन्सची परीक्षा देता येणार आहे. यामध्ये इच्छुक उमेदवार लर्निंग लायसन्स चाचणीकरिता आपल्या सोईनुसार दिवस व वेळ निवडू शकतील. त्यामुळे नागरिकांना परिवहन कार्यालयात रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. एका दिवसाला सात उमेदवारांना नोंदणी करता येईल. सकाळी १0 ते ११, ११ ते १२, दुपारी १२ ते १ व दुपारी १ ते २ अशा चार वेळेत परीक्षा देण्याचा पर्याय अर्जदारांना निवडता येणार आहे.
ह्यडब्लूडब्लूडब्लू.सारथी.एनआयसी.इन या संकेतस्थळावर जाऊन ह्यइश्यू ऑफ लर्निंंग लायसन्स टू मीह्ण हा पर्याय अर्जदाराने निवडावा. हा पर्याय निवडल्यानंतर स्क्रीनवर उपलब्ध झालेल्या अर्जात संपूर्ण माहिती भरावी. तसेच, उजव्या बाजूला अर्ज क्रमांक (अँप्लिकेशन नंबर) असल्याची खात्री करुन तो लिहून घ्यावा व नंतर त्या क्रमांकाने अर्जातील माहिती भरावी. एलएल टेस्ट फॉर ऑनलाईन अँप्लिकेशनवर क्लिक करावे. स्क्रिनवर वेब अँप्लिकेशन नंबर व जन्मतारीख टाकल्यास आपल्या सोयीची तारीख व वेळ निवडण्याची मुभा अर्जदाराला मिळू शकणार आहे.