कांद्याचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी
By Admin | Updated: April 27, 2015 01:35 IST2015-04-27T01:35:38+5:302015-04-27T01:35:38+5:30
औरंगाबाद द्र्रुतगती मार्गावरील लाठी गावानजीक अपघात.

कांद्याचा ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी
मंगरुळपीर (जि. वाशिम) : नागपूर - औरंगाबाद द्र्रुतगती मार्गावरील लाठी गावानजीक नागपूरकडे कांदे भरून जाणारा एम.एच.१७ ए.जी ९९८९ ट्रक दि.२६ च्या सकाळी ७.४५ सुमारास उलटला. या घटनेत ट्रकचालक गंभीर जखमी झाला आहे. अहमदनगरवरून नागपूरकडे कांदे घेऊन जाणारा ट्रक लाठीनजीक अचानक उलटला. यावेळी लाठी व परिसरातील नागरिकांनी ट्रकचालक व क्लिनरचे प्राण वाचविण्यासाठी ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकून पडलेल्या दोघांना सुखरूप बाहेर काढले. ट्रकचालक गंभीर जखमी असल्याचे आढळून आल्यावर १0८ या रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले. नागपूर- औरंगाबाद द्र्रुतगती मार्गावर नेहमीच अपघात घडतात. अशा वेळी परिसराताल नागरिक बघ्याची भूमिका न घेता पोलिसांची मदत पोहचण्यापुर्वी आपले कर्तव्य पार पाडताना दिसतात.