शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

भाव गडगडल्याने नदीत फेकून दिला कांदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:35 IST

शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव : नेहमीच या ना त्या संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसमोर, आता कांद्याचे भाव गडगडल्याने नवे संकट उभे ठाकले आहे. अत्यल्प भाव मिळत असल्याने आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हताश झाले असून, शिवणी येथील श्यामराव राजाराम कुटे नामक शेतकºयाने तर १५ जुलै रोजी भोपालपेंड नदीपात्रात कांदे फेकून दिले.लॉकडाऊनमुळे आसेगाव परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले असून, जवळच्या विविध ठिकाणच्या नामांकित बाजारपेठा बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकºयांची फरफट होत आहे. अमरावती, यवतमाळ याठिकाणी जाणारा कांदा लॉकडाऊनमुळे नेण्यात अडचणी होत्या. पाच महिन्यांपूर्वी कांद्याचे भाव २१०० रुपये क्विंटल होते; ते आता ८०० ते १००० रुपये प्रति क्विंटल आले आहेत. कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकºयांच्या डोळ्यात पाणी आले आहे. २०१९ मध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर लॉकडाऊनमुळे शेती उत्पादीत मालाला भाव नाही आणि त्यात कांद्याचे भाव एकदम गडगडले अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. साधारणत: एक एकर कांदा पिकासाठी मशागत खर्च किमान पाच हजार रुपये, रोप पाच हजार रुपये, लागवड सात हजार रुपये, फवारणी दोन हजार रुपये, खुरपणी एक हजार रुपये, काढणी ९५०० रुपये, कांदा गोणी ३० रुपये, वाहन भाडे व हमाली ४० रुपये, बाजार समिती हमाली तोलाई प्रति गोणी १० रुपये असा किमान खर्च आहे. चालू वर्षी वातावरणातील बदलामुळे सरासरी एकरी उत्पादन १०० क्विंटलपर्यंत आहे. सध्या लॉकडाऊनमुळे परराज्यातील कांदा खरेदी करणाºयांची संख्या कमी झाली आहे. तर स्थानिक व्यापारी अत्यंत कमी भावात खरेदी करण्यास प्राधान्य देतात. अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने लागवड खर्चही वसूल होत नाही. हताश झालेल्या श्यामराव कुटे यांनी एका एकरातील कांदा नदीपात्रात फेकून दिला. शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शिवनी येथील शेतकरी शामराव कुटे, पंजाब ठाकरे, विठ्ठल ठाकरे, केशव भेंडेकर, जयाजी भेंडेकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी