विवाहितेच्या छळप्रकरणी आरोपीस एक वर्ष कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:59 IST2017-09-15T19:58:31+5:302017-09-15T19:59:25+5:30

विवाहितेच्या छळप्रकरणी आरोपीस एक वर्ष कारावास
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने शुक्रवारी एका आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच अन्य तिघांची निर्दोष मुक्तता केली.
वंदना मेधनकर सिरसाट रा.मंगलधाम मंगरुळपीर या फिर्यादी महिलेने २६ एप्रिल २०१५ रोजी पोलिसात तक्रार केली होती की, तिचा पती मेधनकर सिरसाट, सासू चंद्रकला सिरसाट, नणंद रेखा कांबळे, दिर सुमेध सिरसाट यांनी फिर्यादीस माहेरवरून एक लाख रुपये घेवून ये असा तगादा लावला. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून फिर्यादीचा शारीरीक व मानसिक छळ केला. या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ४९८ अ, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल केला. यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केल्यानंतर साक्ष व पुराव्याचे आधारे आरोपी मेधनकर सिरसाट विरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम.आर.पनाड यांनी आरोपीस एक वर्ष सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली तसेच चंद्रकला सिरसाट, रेखा कांबळे, सुमेध सिरसाट यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.