दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी
By Admin | Updated: May 18, 2017 14:32 IST2017-05-18T14:32:16+5:302017-05-18T14:32:16+5:30
सावरकर चौकात दुचाकीने ट्रकला धडक दिली.

दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी
कारंजा लाड- कारंजा येथील मुतीर्जापुर कडे जाणा-या सावरकर चौकात मुतीर्जापुर येथून कारंजा कडे येणा-या दुचाकी व नागपुर येथून अमरावती कडे जाणा-या ट्रकची धडक होउन दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना दि. १८ मे रोजी सकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली. कारंजा तालुक्यातील पानगव्हान येथील बाळू हरीदास पवार वय ३० व नरेंद्र उत्तमराव ताठे वय २८ हे पानगव्हान येथून दुचाकीने कारंजा कडे येथे असतांना सावरकर चौकात दुचाकीने ट्रकला धडक दिली. या धडकेत दुचाकी चालक बाळू हरीदास पवार हा गंभीर जखमी झाला. अपघात ठिकाणी पाणी फांउडेशनचे श्याम सवाई, दिलीप देवतळे व गौरख बडे उपस्थित होते. उपघात झाल्याची माहीती मिळताच अपघात ग्रस्तांनाच्या मदतीकरीता धावून कारंजा ग्रामीण रूग्णांलयात उपचार करून पुढील उपचारा करीता अमरावती येथे पाठविण्यात आले. काही तासानंतर पोलीस घटनास्थळी पोचले. पोलीसांची या चैकात कर्तव्य असतांनी सुध्दा पोलीस कर्मचारी दांडी मारतात हा अपघात चौक असल्यामुळे या ठिकाणी नियमित पोलीस कर्मचारी असणे गरजेचे आहे अशी मागणी वाहण धारकाकडून होत आहे.