वाहनाच्या धडकेत एक जण ठार
By Admin | Updated: November 29, 2014 00:27 IST2014-11-29T00:27:27+5:302014-11-29T00:27:27+5:30
मालेगाव येथील घटना.

वाहनाच्या धडकेत एक जण ठार
मालेगाव (वाशिम) : अज्ञात वाहनाने पाठीमागून जबरदस्त धडक दिल्याने मोटारसायकलवरील एक महिला ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना मेहकर- मालेगाव रोडवरील पावर-हाऊसजवळ २८ रोजी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास घडली.
मोटारसायकल क्रमांक एमएच ३७ एन १७२९ वरून दत्तराव खंडूजी नवघरे हे पत्नी गी ताबाईसह सैलानी येथून दर्शन घेऊन परत येत होते. दरम्यान पावर हाऊसजवळ अज्ञात वाहनाने पाठीमागून मोटारसायकलला जबर धडक दिली. यामध्ये चालक गाडीसह बाजूला फेकला गेला तर पाठीमागे बसलेल्या गीताबाईच्या डोक्यावरुन अज्ञात वाहनाचा चक्का गेल्याने त्या घटनास्थळीच मृत्युमुखी पडल्या. धडक देणारे वाहन घटनास्थळावरुन पसार झाले. या घटनेची फिर्याद दत्तराव नवघरे यानी मालेगाव पो.स्टे. ला दिली आहे. पोलिसानी अज्ञात वाहनाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.