चारा वाहतूकप्रकरणी एका जणावर गुन्हा
By Admin | Updated: June 1, 2015 02:14 IST2015-06-01T02:14:56+5:302015-06-01T02:14:56+5:30
चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर केली कारवाई.

चारा वाहतूकप्रकरणी एका जणावर गुन्हा
मंगरुळपीर (जि. वाशिम): दुस-या जिल्ह्यात चारा घेऊन जाणारा ट्रक तालुक्यातील शेलूबाजार येथील मुख्य चौकात ३१ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलिसांनी पकडला. याप्रकरणी पोलिसांनी एका जणावर गुन्हा दाखल केला आहे. चाराटंचाईच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील चारा परजिल्ह्याकडे नेण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे. जिल्हाधिकार्यांचे बंदी आदेश झुगारून चारा परजिल्ह्यात सर्रास नेला जात असल्याचे वृत्त लोकमतने वारंवार प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्याची दखल घेत मंगरुळपीर पोलिसांनी ३१ मे परजिल्ह्यात चारा घेऊन जाणार्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. शेलूबाजार चौकात पोलीस निरीक्षक व तसेच कर्मचारी अवैध प्रवासी वाहतुकीसंदर्भात कारवाई करीत असताना, चालक सादिक अहमद मोहम्मद हसन (३३ रा. बाश्रीटाकळी) हा एमएच २७ ए ४४५३ क्रमांकाच्या ट्रकने जनावराचा चारा व कुटाराचे पोते अकोला शहराकडे नेत होता. पोलिसांच्या पथकाला हे आढळून येताच कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याची फिर्याद संजय भीमराव घोडसे यांनी दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.