डिक्कीमधून दहा लाख लंपास
By Admin | Updated: October 3, 2014 00:40 IST2014-10-03T00:40:15+5:302014-10-03T00:40:15+5:30
स्कूटरच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने दहा लाख रुपये लंपास केले.

डिक्कीमधून दहा लाख लंपास
वाशिम : सोयाबीनची खरेदी-विक्री करणार्या एका व्यापार्याचे स्कूटरच्या डिक्कीमधून अज्ञात चोरट्याने दहा लाख रुपये लंपास केले. ही घटना २ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माधव नगर, लाखाळा परिसरात घडली.
शहरातील शिवाजी हायस्कूल परिसरात शशिकांत देवाणी यांचे किशन ट्रेडर्स नावाने दुकान आहे. देवाणी हे सोयाबीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. खरेदी-विक्रीच्या माध्यमामधून जमा झालेले दहा लाख रूपये देवाणी यांनी १ ऑक्टोबर रोजी घरी ठेवले होते. ही रक्कम बँकेमध्ये भरण्यासाठी त्यांनी २ ऑक्टोबर रोजी सोबत घेतले; मात्र २ ऑक्टोबर रोजी बँक बंद असल्याचे त्यांना दुकानवर आल्यावर लक्षात आले. सदर रक्कम देवाणी यांनी आपल्या स्कुटरच्या डिक्कीमध्ये ठेवून परत घरी जेवन करण्यासाठी गेले. रोख रक्कम असलेली स्कुटर त्यांनी घरासमोर उभी करून घरामध्ये गेले. परत येऊन पाहले असता अज्ञात चोरट्याने डिक्कीतील दहा लाख लंपास केल्याचे दिसुन आले. वाशिम शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंविचे कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास एपीआय पी.एन. बहुरे करीत आहेत.