घरासमोरून एक लाखाचे सोयाबीन लंपास

By Admin | Updated: November 23, 2015 01:08 IST2015-11-23T01:08:12+5:302015-11-23T01:08:12+5:30

कुंपणभिंतीवरून सोयाबीनच्या पोत्यांची चोरी.

One lacquer soybean lumpas from the front of the house | घरासमोरून एक लाखाचे सोयाबीन लंपास

घरासमोरून एक लाखाचे सोयाबीन लंपास

वाशिम : शहरातील आययूडीपी कॉलनीत घरासमोरील व्हरांड्यातून एक लाख रुपये किमतीचे २५ क्विंटल सोयाबीन लंपास करण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. आययूडीपी कॉलनी येथील रहिवासी गणेश जाधव यांनी त्यांच्या घरातील पोर्चमध्ये २५ क्विंटल सोयाबीन पोत्यांमध्ये भरून ठेवले होते तसेच घराच्या कुंपणभिंतीला असलेल्या प्रवेशद्वाराला कुलूप लावले होते. शनिवारी चोरट्यांनी अंगणात शिरून कुंपणभिंतीवरून सोयाबीनच्या पोत्यांची चोरी केली. पोर्चमधील २५ क्विंटल सोयाबीन असलेली ३0 पोती चोरट्यांनी चोरून नेली. या परिसरात चोरी तसेच गैरप्रकार होऊ नयेत, याकरिता पोलीस चौकी स्थापन करण्यात आली होती; मात्र ही पोलीस चौकी गत काही वर्षांंपासून बंद आहे. त्यामुळे या भागात चोरीचे प्रमाण वाढले आहे तसेच अन्य गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे सदर पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: One lacquer soybean lumpas from the front of the house