वाहनाच्या धडकेत एक ठार; दोन जण गंभीर
By Admin | Updated: January 5, 2017 17:29 IST2017-01-05T17:29:28+5:302017-01-05T17:29:28+5:30
कार व क्रुझरची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कारंजा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली

वाहनाच्या धडकेत एक ठार; दोन जण गंभीर
ऑनलाइन लोकमत
कारंजा (वाशिम), दि. 5 - कार व क्रुझरची समोरासमोर धडक होऊन त्यात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास कारंजा येथील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली.
शेलुबाजार येथील विद्यार्थी कारंजा येथील जे.डी चवरे शाळेत घेऊन जात असतांना एम. एच. २९ - जे ५०३ क्रमांकाच्या क्रूझर गाडीने अमरावतीकडून शेलुबाजारकडे जाणाऱ्या एम. एच. २७ - एच ५२४७ क्रमांकाच्या इस्टिम एल.एक्स. या कारला समोरासमोर धडक दिली. या अपघातात रुख्मिणीनगर अमरावती येथील जानराव गाभणे (६८) हे जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी सिंधु गाभणे (६०) व एक शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारार्थ अमरावती व अकोला येथे हलविण्यात आले. ४ जानेवारीपासून चिखली झोलेबाबा येथे सुरू असलेल्या भागवत सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी गाभणे दाम्पत्य जात होते. गाभणे दाम्पत्य हे चिखलीच्या झोलेबाबा देवस्थानचे विश्वस्त असल्याची माहिती आहे. या अपघातात इतर ५ ते ६ विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून, स्थानिक ग्रामीण रूग्णालयात उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.