अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
By Admin | Updated: February 10, 2016 02:11 IST2016-02-10T02:11:42+5:302016-02-10T02:11:42+5:30
रिसोड तालुक्यातील घटना.

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
रिसोड : तालुक्यातील बिबखेड गावाजवळ झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, रिसोड येथील आसगल्ली परिसरात वास्तव्यास असलेले मुरली हरिभाऊ जहिरव व महात्मा फुले नगरमधील शे.युनूस शे.युसूफ ऊर्फ मन्नान हे दोघे सायंकाळच्या सुमारास दुचाकी वाहनाने रिसोडकडे येत असताना दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मुरली जहिरव (वय ३४ वष्रे) जागीच ठार झाले असून, त्यांच्यासोबत असलेले शे.युनूस शे.युसूफ ऊर्फ मन्नान हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविण्यात आले आहे. मुरली जहिरव यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, पत्नी, आई, वडील, बहिण, भाऊ असा परिवार असून, त्यांच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.