दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघात एक ठार, चार गंभीर

By Admin | Updated: April 13, 2016 01:19 IST2016-04-13T01:19:46+5:302016-04-13T01:19:46+5:30

कारंजा तालुक्यातील घटना.

One killed two different bike accidents, four serious | दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघात एक ठार, चार गंभीर

दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघात एक ठार, चार गंभीर

कारंजा लाड (जि. वाशिम): दोन वेगवेगळ्या दुचाकी अपघातात चार दुचाकीस्वार गंभीर जखमी, तर एक ठार झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास मंगरुळपीर मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडली.
मृतक दुचाकीस्वाराचे नाव विजय पंडितराव देशमुख (३६ रा. आनंद कॉलोनी, रिसोड) असून, तो आपल्या दुचाकीने मंगरुळपीरकडे जात होता तसेच विरुद्ध दिशेने कारंजा येथील शैलेश ठाकरे (३५) व इम्रान खान जहूर खान (३५) नवीन दुचाकीने येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कारंजा ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले. कारंजा-इंझोरी मार्गावर झालेल्या दुसर्‍या दुचाकी अपघातात इंझोरी येथील नारायण उत्तम भोजापुरे (३५) व गोपाल रोकडे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर कारंजा येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता अकोल्याला हलविण्यात आले.

Web Title: One killed two different bike accidents, four serious