टिप्पर अपघातात एक जण ठार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:42 IST2021-05-18T04:42:45+5:302021-05-18T04:42:45+5:30
शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गाने एम एच ४० बिजी ६००१ क्रमांकाचे खासगी प्रवाशी वाहन पूणे येथून मालेगावकडे ...

टिप्पर अपघातात एक जण ठार!
शिरपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत औरंगाबाद-नागपूर द्रुतगती मार्गाने एम एच ४० बिजी ६००१ क्रमांकाचे खासगी प्रवाशी वाहन पूणे येथून मालेगावकडे येत होते, तर एम एच ३७ टी ९९२२ क्रमांकाचे टिप्पर विरुद्ध दिशेने मेहकरकडे जात होते. चांडस-कळमगव्हाण या गावादरम्यान खासगी प्रवाशी वाहन आणि टिप्परमध्ये जबर धडक झाली. यामध्ये टिप्पर चालक दीपक खुशालराव देशमुख रा.चांडस याचे शीर धडावेगळे झाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात खासगी प्रवाशी वाहनाच्या चालकसह १० ते १२ प्रवासीही जखमी झाले. ते परस्पर उपचारासाठी गेले असल्याने त्यांची नावे कळू शकली नाहीत. घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक शरद साठे हे घटनास्थळावर हजर झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.