शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

अनसिंगमध्ये तुंबळ हाणामारीत एकाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 19:23 IST

अनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. जैन शाळा ते पोलिस स्टेशनदरम्यान घडली.

क्षुल्लक कारणावरून वाद : पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली घटनालोकमत न्यूज नेटवर्कअनसिंग (वाशिम) : येथील प.दि. जैन शाळेतील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमादरम्यान क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत होवून एका ५२ वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना मंगळवार, १५ जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प.दि. जैन शाळा ते पोलिस स्टेशनदरम्यान घडली.मृतकाचा भाऊ राहुल केशव काळे (वय ३५ वर्षे) यांनी अनसिंग पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात माझा मुलगा विक्रमादित्य राहुल काळे याचा कार्यक्रम बघायला मी व माझा भाऊ संजय केशव काळे मंगळवार, १५ जानेवारीला दुपारी दीड वाजताच्या सुमारास गेलो. कार्यक्रम सुरू असताना त्याठिकाणी आलेल्या सागर सुरेश गव्हाणे हा माझ्याकडे रागाने पाहत होता. त्याबद्दल त्यास जाब विचारला असता, त्याने शिविगाळ करून मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली. हा वाद त्याठिकाणी संपला होता. मात्र, शाळेतून घरी जात असताना सागर गव्हाणे याच्या चहाच्या दुकानानजिक श्याम गव्हाणे, अजय गव्हाणे, अंकुश सोनुनेचा मुलगा, अक्षय आमरावतकर, रामा गव्हाणे, श्यामा शिंदे, गजानन गव्हाणे, गणेश राऊत, गणेश आमरावतकर व अन्य काही लोकांनी आम्हाला अडवून सागर गव्हाणे याने चहाच्या टपरीत ठेवून असलेला लोखंडी रॉड आणून माझ्या डोक्यावर मारून जखमी केले व इतरांनी लाथा-बुक्यांनी मारहाण केली. त्याठिकाणहून आम्ही पोलिस स्टेशनकडे तक्रार दाखल करायला जात असताना आमच्या मागून सागर गव्हाणे हा पळत आला व त्याने दगड घेवून तो माझा भाऊ संजय काळे याच्या डोक्यात घातला. यात भाऊ जबर जखमी झाला. त्यास माझे काका रमेश काळे, चुलत भाऊ नीलेश काळे, गजानन गवळी यांच्या मदतीने सरकारी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. यादरम्यान आरोपींनी आमच्या घरावरही दगडफेक करून दुचाकी वाहनासह अन्य साहित्याचे नुकसान केले. अशा आशयाच्या फिर्यादीवरून अनसिंग पोलिसांनी नमूद सर्व आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३२४, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, २९४, ४२७, ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर हत्येचा गुन्हा मात्र दाखल झालेला नव्हता. संजय काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू!संजय केशव काळे यांच्यावर अनसिंगच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून त्यांना वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पुर्वीच त्यांचा मृत्यू झालेला होता, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हरण यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी