दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: April 14, 2015 00:34 IST2015-04-14T00:34:41+5:302015-04-14T00:34:41+5:30
शेगाव येथील घटना.

दुचाकीच्या धडकेत एक ठार, एक गंभीर
शेगाव (जि. बुलडाणा) : भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने पवन मेटांगे हा युवक ठार तर एकजण गंभीर झाल्याची घटना १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारास स्नेहानजली हॉटेल समोर घडली. स्थानिक एस.बी.आय. कॉलनी येथील राहणार व सिध्दीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाचा भाग २ मधील विद्यार्थी पवन देविदास मेटांगे (२0) हा युवक आपल्या मोटार सायकलने विद्यालयात जात असताना विरुध्द दिशेने येणार्या भरधाव मोटारसायकलने समोरुन जोरदार धडक दिली असता पवन मेटांगे व एक विद्यार्थी गंभीर जखमी झाले.
त्यांना तात्काळ १0८ क्रमांकाचे रुग्णवाहिकेने प्रथम सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. दोघा युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी अकोला सवरे पचार रुग्णालयात पाठविण्यात आले.
मात्र पवन देविदास मेटांगे या युवकावर रस्त्यातच काळाने झडप घातली. या प्रकरणाची पोलिस स्टेशनला विचारणा केली असता कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तर घटनास्थळावरुन दोन्ही दुचाक्या परस्पर पळविण्यात आल्याचे समजते.