मोटारसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: June 27, 2014 01:45 IST2014-06-27T01:43:14+5:302014-06-27T01:45:37+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील अपघातात एक ठार, एक गंभीर

मोटारसायकल अपघातात एक ठार, एक गंभीर
मंगरुळपीर : तालुक्यातील चेहेल फाटयानजीक २६ जून रोजी सकाळी १0.३0 वाजता दोन मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.या अपघातात अकोला तालुक्यातील पातूर येथील एका इसमाचा मृत्यू झाला तर मंगरुळपीर तालुक्यातील वरूड येथील इसमा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील अतुल पंडित हे मंगरूळपीरकडून मोहगव्हाण पारवाकडे मोटारसायकलने जात असताना अकोला जिल्ह्यातील पातूर येथील विनायक बाबुसिंग चव्हाण हे मोटारसायकलने विरुद्ध दिशेने येत होते.या दोन्ही मोटारसायकलची चेहेल फाट्यावर जोरदार धडक झाली.या अपघातात पातूर येथील विनायक चव्हाण (वय ३५ ) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर कोठारी येथील अतुल पंडित हे गंभीर जखमी झाले.त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी एमएच ३७ बी ८२१0च्या चालकाविरुद्वध भादंवि २७९,३३४,३0४(अ) नुसार गुन्हा दाखल केला .