मोटारसायकल अपघातात एक ठार

By Admin | Updated: July 11, 2017 02:01 IST2017-07-11T02:01:00+5:302017-07-11T02:01:00+5:30

मंगरूळपीर : गाय आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चांभई फाट्याजवळ घडली.

One killed in a motorcycle accident | मोटारसायकल अपघातात एक ठार

मोटारसायकल अपघातात एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : गाय आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चांभई फाट्याजवळ घडली.
फिर्यादी शुभम प्रकाशराव पाध्ये रा.खडी यांनी पोलिसात तक्रार दिली की, ऋषीकेश रवि दिवाकर व रवि लक्ष्मणराव दिवाकर रा.अकोला हे एम.एच.३० ,ए.डी.२००१ क्रमांकाच्या मोटारसायकलने मोहरी जात होते. चांभई फाट्याजवळ गाय आडवी आल्याने अपघात झाला. यामध्ये रवि लक्ष्मणराव दिवाकर (५०) यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी कलम २७९, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One killed in a motorcycle accident