लक्झरी-मोटार सायकल अपघातात एक ठार
By Admin | Updated: September 26, 2014 23:43 IST2014-09-26T23:43:49+5:302014-09-26T23:43:49+5:30
वाशिम-अकोला महामार्गावरील अपघात.

लक्झरी-मोटार सायकल अपघातात एक ठार
मालेगाव (वाशिम) : वाशिम-अकोला महामार्गावर उभ्या असलेल्या खाजगी लक्झरी बसला मोटार सायकलस्वाराने मागून धडक दिल्याने त्यात मोटार सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दुपारी १२.३0 च्या दरम्यान लक्झरी बस प्यारा सॉ मिलजवळ क्रं. एम.एच. ३७ बी. ६८६७ उभी होती. त्यावेळी मागून भरधाव वेगाने येणार्या मोटार सायकल क्रं. एम.एच. ३७ ४९९0 ने मागून जोरदार धडक दिली.
त्यामध्ये गाडीवर स्वार युवक खुशाल विठ्ठलराव गजभार (वय ३0) रा. गोकसावंगी हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आला आहे. सायंकाळी वृत्त लिहेपर्यंंत गुन्हय़ाची नोंद करण्यात आली नव्हती. मात्र खाजगी लक्झरी बस मालेगाव पोलिस स्टेशनला लावण्यात आली होती. पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहे.