कार अपघातात एक ठार ; तीन जण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST2021-02-05T09:21:53+5:302021-02-05T09:21:53+5:30

कामरगाव येथील चार जण (एम. एच. २७ एच १७८३) या क्रमाकांच्या कारने अमरावतीवरून कामरगावला येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा ...

One killed in car accident; Three serious | कार अपघातात एक ठार ; तीन जण गंभीर

कार अपघातात एक ठार ; तीन जण गंभीर

कामरगाव येथील चार जण (एम. एच. २७ एच १७८३) या क्रमाकांच्या कारने अमरावतीवरून कामरगावला येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा कारच्या आडवा आला. या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात अब्दुल अजीज अब्दुल हकीम (वय २९, रा. कामरगाव) यांचा मृत्यू झाला तर अब्दुल अजीम अब्दुल हकीम (३२), असीया परवीन अब्दुल अजीम (२४) व महफुज अब्दुल अजीम (सर्व रा. कामरगाव) हे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी कामरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे पाठविण्यात आले. दरम्यान, अब्दुल शोएब अब्दुल हकीम यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली धनज पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed in car accident; Three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.