दुचाकी अपघातात एक ठार
By Admin | Updated: June 22, 2016 00:38 IST2016-06-22T00:38:19+5:302016-06-22T00:38:19+5:30
वाशिम येथे अपघातात दुचाकीस्वार ठार.

दुचाकी अपघातात एक ठार
वाशिम : मागून येणार्या ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना स्थानिक पोस्ट ऑफिस चौकात २१ जून रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास घडली. संजय शिंदे असे मृताचे नाव असून, ते काटा येथे लाइनमन म्हणून कार्यरत होते. एमएच ३0 झेड ७६७५ क्रमांकाच्या दुचाकीने ते पोस्ट ऑफिस चौकातून मंगळवारी रात्रीच्या सुमारास जात असताना, ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये संजय शिंदे गंभीर जखमी झाले. उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.