अपघातात एक ठार; एक गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 20:57 IST2017-09-07T20:56:34+5:302017-09-07T20:57:30+5:30
कनेरगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री ७.३० वाजतादरम्यान हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील दंत महाविद्यालयाजवळ घडली.

अपघातात एक ठार; एक गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
कनेरगाव : ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरूवारी रात्री ७.३० वाजतादरम्यान हिंगोली ते कनेरगाव मार्गावरील दंत महाविद्यालयाजवळ घडली.
राजू अढाव (४२) व ज्ञानेश्वर येवले (३८) रा. ब्राह्णमवाडा ता. वाशिम हे दोघे जण हिंगोलीवरून वाशिमकडे दुचाकीवर येत होते. दरम्यान, हिंगोली ते कनेरगााव मार्गावरील दंत महाविद्यालयानजीकच्या हरियाणा ढाब्याजवळ एका ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये राजू अढाव हा जागीच ठार झाला तर ज्ञानेश्वर येवले हा गंभीर जखमी असून, त्यास परभणी येथील रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास हिंगोली पोलीस करीत आहेत.