कारंजात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 16:55 IST2017-11-04T16:52:12+5:302017-11-04T16:55:20+5:30
कारंजा लाड : दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एक जन जागीच ठार झाल्याची घटना ३ नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा येथील बायपास परीसरातील शोभनाताई चवरे विद्यालयनजिक घडली.

कारंजात दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात एक ठार
ठळक मुद्देवाहन स्लिप झाल्यामुळे अपघात मृतक काजळेश्वरचा
कारंजा लाड : दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात एक जन जागीच ठार झाल्याची घटना ३ नोव्हेबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास कारंजा येथील बायपास परीसरातील शोभनाताई चवरे विद्यालयनजिक घडली.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिलायंस पेट्रोल पंपावरुन कारंजा बायपासकडे परत येत असतांना दुचाकि स्लिप होऊन झालेल्या अपघातात राजू सुखदेव फरास वय ४५ वर्ष रा. काजळेश्वर हे जागीच ठार झाल्ो. दरम्यान कारंजा शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली.