अपघातात एक जण ठार
By Admin | Updated: November 14, 2015 00:50 IST2015-11-14T00:12:38+5:302015-11-14T00:50:38+5:30
परंडा : कुर्डूवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या जीप व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एका युवकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले़

अपघातात एक जण ठार
परंडा : कुर्डूवाडीहून परंड्याकडे येणाऱ्या जीप व उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकची समोरासमोर जोराची धडक झाल्याने एका युवकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले़ हा अपघात गुरूवारी रात्रीच्या सुमारास वागेगव्हाण नजीक घडला असून, या प्रकरणी शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता़ जखमींवर बार्शी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पाचपिंपळा येथील ज्ञानेश्वर खैरे (वय-२४), सिध्देश्वर लांडगे (वय-३०), बालाजी खैरे (वय-२२), शशिकांत खैरे (वय-३०), तुकाराम डांगे (वय-२०) हे गुरूवारी दुपारी पाडव्यानिमित्त मोहळ तालुक्यातील नागनाथ वडवळ्याला नागोबाच्या दर्शनासाठी गेले होते़ दर्शन घेवून ते मोहोळ, माढा मार्गे कुर्डूवाडीतून परंड्याकडे येत होते़ रात्रीच्या सुमारास त्यांची जीप वागेगव्हाणनजीक आली असता समोरून येणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक झाली़ या अपघातात जीपमधील ज्ञानेश्वर खैरे हा समोरील काचातून बाहेर फेकला जावून त्याच्या डोक्याला, कपाळावर गंभीर दुखात झाली़ गंभीर जखमी झालेल्या ज्ञानेश्वर खैरे याचा जागीच मृत्यू झाला़ तर वागेगव्हाण येथील ट्रॅक्टरचा चालक वैजिनाथ अभिमान जगताप याचा एक पाय मोडला असून, तोही गंभीर जखमी झाला आहे़ तसेच जीपमधील सिध्देश्वर लांडगे, बालाजी खैरे, शशिकांत खैरे, तुकाराम डोंगे हे जखमी झाले़ जखमींना तत्काळ उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या अपघाताची शुक्रवारी रात्रीपर्यंत पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती़ (वार्ताहर)