नागरे हत्यप्रकरणी एकास अटक
By Admin | Updated: October 21, 2014 00:03 IST2014-10-21T00:03:29+5:302014-10-21T00:03:29+5:30
खुन प्रकरणातील फरार आरोपीस वर्धा येथे अटक.

नागरे हत्यप्रकरणी एकास अटक
अनसिंग (वाशिम): अनसिंग जवळा मार्गावर येथील प.दी.जैन विद्यालयातील सेवक हरिभाऊ नागरे यांचा खुन प्रकरणातील फरार आरोपीस पोलिसांनी सोमवार सकाळी वर्धा येथे अटक केली. आरोपीला न्यायालयापुढे उभे केले असता त्याला २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. ६ ऑक्टोबर रोजी भर दुपारी हरिभाऊ नागरे याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील एक आरोपी प्रदिप चव्हाण यास घटना घडल्यानंतर काही तासामध्येच अटक केली होती. मात्र घटना घडली तेव्हापासून या प्रकरणातील दुसरा आरोपी आदित्यकुमार वाळली फरार होता. या प्रकरणाच्या तपासासाठी अनसिंग पोलिसांचे एक पथक तीन दिवसांपूर्वीच वर्धा, नागपूर कडे रवाना झाले होते. ठाणेदार चंद्रशेखर कदम यांचे मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक आशिष बेतल यांनी या आरोपीस आज सोमवारी पहाटेच्या सुमारास वर्धा येथे अटक केली. पोलिसांनी या आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस २४ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी दिली.