वनक्षेत्र अतिक्रमण प्रकरणी एक अटक

By Admin | Updated: September 2, 2014 23:00 IST2014-09-02T22:48:39+5:302014-09-02T23:00:58+5:30

जळगावजामोद वनक्षेत्रात अतिक्रमण करणार्‍या इसमास अटक; न्यायालयीन कोठडीत रवानगी.

One arrested in forest area encroachment case | वनक्षेत्र अतिक्रमण प्रकरणी एक अटक

वनक्षेत्र अतिक्रमण प्रकरणी एक अटक

जळगाव जामोद : वनपरिक्षेत्राअंतर्गत रायपुर बिटमध्ये वनजमीन क्षेत्रावर झाडाझुडपे तोडून अतिक्रमण करीत असताना वनपरिक्षेत्राधिकारी डी.एस.काळे यांनी १ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडून अटक केली. दरम्यान आज आरोपी मोनासिंग रामजा पावरा वय ४८ रा.वडगाव याचा न्यायालयाने जामिन नाकारला. त्यामुळे त्याची बुलडाणा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.या खात्यातील वनपाल व वनरक्षकांचा संप असल्या कारणाने एकमेव वनपरिक्षेत्राधिकारी काळे यांनाच सर्व प्रकरण हाताळावे लागणार आहे. सदर आरोपीने वन कम्पार्टमेंट क्रमांक ३७९ मध्ये अतिक्रमण करण्याचे उद्देशाने झाडे झुडपे तोडून साफ सफाई केली असता त्याला वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. त्याचेविरुध्द वनगुन्हा क्रमांक १/६१३ वनअधिनियम १९२७ चे कलम २६ (१) अ ६३ अ,ब,क, सह ६५ (अ) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये आरोपीने २ हेक्टर जमीनीवरील झाडे, झुडपे रोपटे तोडली. जाळपोळ केली, लाकडाच्या गंजी लावून विभागाचे अंदाजे ३५ हजाराचे नुकसान केले. या कारवाईत वनमजुर भगवान जामुनकर, बाबुराव जामुनकर, बलदार तडवी, तुकाराम हांडके, रमेश चव्हाण यांनी सहभाग घेतला.

Web Title: One arrested in forest area encroachment case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.