चंद्रपूर येथील दारू दुकान स्थलांतरणाचा एक अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2015 01:55 IST2015-04-18T01:55:38+5:302015-04-18T01:55:38+5:30

वाशिम जिल्हय़ातील शेलूबाजार दारू दुकान सुरू करण्यासाठी वाशिम जिल्हा उत् पादन शुल्क विभागाकडे एक अर्ज दाखल.

One application for transfer of liquor shop in Chandrapur | चंद्रपूर येथील दारू दुकान स्थलांतरणाचा एक अर्ज

चंद्रपूर येथील दारू दुकान स्थलांतरणाचा एक अर्ज

वाशिम : महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हय़ात बंद केलेल्या दारू विक्रीच्या एका दुकानदाराने स्थलांतर या सबबीवर वाशिम जिल्हय़ातील शेलूबाजार येथे सदर दारू दुकान सुरू करण्यासाठीच्या परवानगीबाबत जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे आतापर्यंत एक अर्ज दाखल केला आहे, अशी माहिती जिल्हा उत्पादन शुल्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्हय़ात दारुबंदीचा आदेश दिलेला असून, शासनाच्या या आदेशामुळे बंद झालेल्या दारूविक्री दुकानाचा मालकांनी आपली दुकाने अन्यत्र स्थलांतरित करण्याच्या हालचाली वेगात सुरू केल्या असून, वाशिम जिल्हय़ात धाव घेतली आहे. चंद्रपूर येथील मीराबाई रतनलाल जैस्वाल यांनी शेलूबाजार या गावात दारू दुकान सुरू करण्याबाबत जिल्हा उत्पादन शुल्क विभागाकडे अर्ज दाखल केला आहे. शेलूबाजार येथे सदर दारू विक्रीचे दुकान सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार लखन मलिक व आमदार अमित झनक या लोकप्र ितनिधींसह शेलूबाजारत तंटामुक्त अध्यक्ष तसेच भाजपाचे शहराध्यक्ष विशाल केदार गुप्ता यांनी निवेदनाद्वारे केली आहे. चंद्रपूर जिल्हय़ातील बंद झालेली दारू दुकाने वाशिम जिल्हय़ात सुरू करू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी दंड थोपटले असून, जिल्हय़ातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे याकडे आता जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

Web Title: One application for transfer of liquor shop in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.