मुक्कामी जाणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:06+5:302021-07-30T04:43:06+5:30
जिल्ह्यातील चारही आगारांतून विविध गावांत मुक्कामी जाणाऱ्या प्रत्येक बसवरील चालक व वाहकही रात्री विविध गावांमध्ये मुक्कामी राहतात. मुक्कामी बसेस ...

मुक्कामी जाणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली
जिल्ह्यातील चारही आगारांतून विविध गावांत मुक्कामी जाणाऱ्या प्रत्येक बसवरील चालक व वाहकही रात्री विविध गावांमध्ये मुक्कामी राहतात. मुक्कामी बसेस सायंकाळी निघतात. सकाळी पुन्हा या बसेस प्रवाशांना घेऊन आगारात येतात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या बस गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. आता कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी २५ पैकी केवळ ७ बसगाड्या सुरू आहेत, तर उर्वरित १८ बसगाड्या आगारातच थांबल्याने प्रवाशांची गैरसोय वाढली आहे.
------------
आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बसेस
आगार पूर्वी थांबणाऱ्या बसेस सध्या थांबणाऱ्या बसेस
वाशिम ०६ ००
कारंजा ०८ ०४
मं.पीर ०५ ०१
रिसोड ०८ ०२
-------------------------------
५० टक्के बसेस आगारातच
१) कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला कठोर लॉकडाऊनमुळे एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती.
२) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर अधिकच परिणाम झाला. त्यामुळे बसगाड्यांची संख्या कमी झाली.
३) काही निर्बंध वगळता एसटीची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली असली तरी प्रतिसादाअभावी ५० टक्क्यांहून अधिक बस आगारातच आहेत.
----
रुग्ण घटले; एसटी कधी धावणार
१) कोट :
कोरोनापूर्वी रुई-गोस्ता येथे रात्री मुक्कामी बस यायची. त्याचा आम्हाला आधार होता. कोरोनामुळे वर्षभरापासून ही बस बंदच आहे. त्यामुळे रात्री गावी येण्यासाठी वाहन मिळणे कठीण झाले, तर सकाळीही शहरात जाण्यासाठी वाहन नाही.
- हरिओम गावंडे, प्रवासी
------------
कोट :
वाशिम आगारातून कोरोनापूर्वी ग्रामीण भागांत सहा बसगाड्या मुक्कामी पाठविल्या जात होत्या. कोरोनामुळे त्या बंद करण्यात आल्या; परंतु आता कोरोना संसर्गाचे रुग्ण घटले असतानाही या बसगाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे आमची मोठी गैरसोय होत आहे.
- प्रकाश गंगावणे, प्रवासी
----------------
आगार प्रमुख कोट
कोट :
कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागांतील बसगाड्या कमी कराव्या लागल्या, तर आता नादुरुस्त गाड्यांची संख्या वाढली असून, मुक्कामी पाठविण्यासाठी बसगाड्या नाहीत. त्यात प्रवाशांचाही अपेक्षित प्रतिसाद नसल्याने या बसगाड्या अद्याप सुरू करता आल्या नाहीत. येत्या काही दिवसांत परस्थितीचे अवलोकन करून त्या गाड्या सुरू करू.
- विनोद ईलामे,
आगार व्यवस्थापक, वाशिम