शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या ओम क्रीडा मंडळाला सुवर्णपदक

By admin | Updated: October 14, 2014 00:19 IST

अकोला येथे विदर्भ राज्य व आंतरजिल्हा कॅरम स्पर्धा

अकोला: विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेचे सांघिक विजेतेपद नागपूरच्या ओम क्रीडा मंडळाने नागपूरच्याच नवल कॅरम इन्स्टिट्युटचा पराभव करून सुवर्णपदक पटकाविले. नवल कॅरम इन्स्ट्यिुट रौप्यपदकाचे मानकरी ठरले, तर नवयुवक क्रीडा मंडळ नागपूर या चमूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेवर नागपूरकरांचे वर्चस्व राहिले. सांघिक विजेतेपद स्पर्धेत ओम क्रीडा मंडळाच्या विशाल रामटेके याने नवल मंडळाच्या सुरज दोडके याच्यावर २५-११, ४-२५, २५-१२ अशी मात केली. ओम मंडळाच्याच नीलेश जांभुळकर याने नवलच्या मनीष टेंभुर्णेवर २५-१२,२५-१५ अशी मात केली. ओम मंडळाच्या तोमेश्‍वर पराते- रोहित सकते यांनी नवलच्या विजय कनोजिया-विजय वानखेडे यांच्यावर १६-१८, २५-0, १८-१२ अशी मात केली. पुरुष एकेरीत बुलडाण्याच्या शेख नाजीम याने माजी राज्य विजेता नितीन मेश्राम (राय क्लब नागपूर) याचा २२-११,२५-१४ असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून स्पर्धेत खळबळ उडवून दिली. दुसर्‍या सामन्यात बुलडाण्याच्या मोहम्मद तौसिफ याने नागपूरच्या नवल मंडळच्या सुरज दोडके याचा २५-५, १७-२५, २५-१३ अशा संघर्षपूर्ण लढतीत पराभव करून आश्‍चर्याचा धक्का दिला. बाश्रीटाकळी येथील स्टार क्लबचा शेख मेहबूब याने बाश्रीटाकळीच्याच शेख इमामला २५-१७, १६-२५, २५-१0 असे पराभूत केले. नागपूर येथील वरिष्ठ राष्ट्रीय खेळाडू शंकर मामडीवार याने बुलडाण्याचा मो. साजीद याचा २५-0,२५-४ असा सणसणीत पराभव केला. ओम मंडळाच्या विशाल रामटेके याने बाश्रीटाकळीच्या आमीर खान याचा २५-१५,२५-४ असा पराभव केला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक प्रदान करण्यात आले.